पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकची झलक; आला हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'चा दमदार ट्रेलर

नुकताच ‘फायटर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये हृतिकने स्क्वॉड्रन लीडर ‘शमशेर पठानिया’ची भूमिका साकारली आहे.
पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकची झलक; आला हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'चा दमदार ट्रेलर

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ‘फायटर’ हा देशभक्तीपर चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर, कलाकारांचे लूक निर्मात्यांकडून शेअर करण्यात आले होते. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जोडी एकत्र काम करताना पहायला मिळेल. नुकताच ‘फायटर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये हृतिकने स्क्वॉड्रन लीडर ‘शमशेर पठानिया’ची भूमिका साकारली आहे.

‘फायटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. देशात २०१९ मध्ये झालेला पुलवामा हल्ला व त्यानंतर भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेला एअर स्ट्राइक याची झलक फायटर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘फायटर’मध्ये अभिनेता अनिल कपूर हा अधिकाऱ्यांच्या भुमिकेत दिसेल. या ट्रेलरमध्ये हृतिक – दीपिका यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे..

‘फायटर’मध्ये हृतिक-दीपिका व अभिनेते अनिल कपूर यांच्याशिवाय करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अजीज या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in