KRK Arrest : '...जर मी मेलो तर' ; सलमान खानवर गंभीर आरोप; KRK ला मुंबई विमानतळावरुन अटक

मुंबई विमानतळावरुनच त्याला ताब्यात घेतले आहे. KRK ला 2016 सालच्या एका प्रकरणात अटक करण्यात आले आहे. त्याने ट्विट करत आपल्या अटकेची माहिती दिली असून यावेळी अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.
KRK Arrest : '...जर मी मेलो तर' ;  सलमान खानवर गंभीर आरोप; KRK ला मुंबई विमानतळावरुन अटक

कमाल आर खान उर्फ केआरके याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुनच त्याला ताब्यात घेतले आहे. KRK ला 2016 सालच्या एका प्रकरणात अटक करण्यात आले आहे. त्याने  ट्विट करत त्याला झालेल्या अटकेची माहिती दिली असून यावेळी अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

के.आर.के हा वादग्रस्त चित्रपट समीक्षक आहे. तो अनेकदा बॉलीवूड सिनेमांची विडंबनात्मक समीक्षा देखील करत असतो. त्याला 2016 सालच्या एका प्रकरणात अटक केल्याची माहिती त्याने ट्विट करत दिली आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतोय की, “ मी नवीन वर्षासाठी दुबईला जात होतो. पण, मुंबई पोलिसांनी मला विमानतळावरच अटक केली आहे. पोलिसांनी मला सांगितल्यानुसार, मी 2016 सालच्या एका प्रकरणात वॉन्टेड आहे. सलमान खान म्हणतोय की त्याचा #Tiger 3 हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झाला. माझा पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात कोणत्याही परिस्थितीत मृत्यू झाला, तर तुम्हा सर्वांना हे कळले पाहिजे की तो खून आहे, आणि तुम्हाला माहिती आहे, याला कोण जबाबदार आहे!” असा आरोप त्याने केला आहे.

तसेच मी गेल्या वर्षभरापासून मुंबईत असून माझ्या सर्व न्यायालयीन तारखांना उपस्थित राहत असल्याचे देखील तो आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.

दरम्यान, के.आर.के ला काही पहिल्यांदा अटक झालेली नाही. त्याला याआधी 2022 साली दोन वेळा अटक करण्यात आली होती. दिवंगत अभिनेते इरफान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल कथित वादग्रस्त ट्विट शेअर केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला अटक झाली होती. यानंतर सप्टेंबर महिन्यात फिटनेस ट्रेनरवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in