'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' मध्ये '12th Fail' चा जलवा, रणबीर-आलिया ठरले Best Actor

'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर, रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' मध्ये '12th Fail' चा जलवा, रणबीर-आलिया ठरले Best Actor

'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमध्ये पार पडला. गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (GIFT) सिटी येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, '12th Fail' हा वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

विक्रांत मॅसीचा '12th Fail' हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. यासोबतच विनोद चोप्रा यांना '12th Fail'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 'ॲनिमल'ने तीन पुरस्कार पटकावले आहेत. या दोन चित्रपटांपेक्षा जास्त पुरस्कार विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटाने फिल्मफेअरमध्ये पटकावले आहेत. शाहरुख खानच्या ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'जवान' ने 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये देखील वर्चस्व गाजवले, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत अमित रॉयला 'ओह माय गॉड 2', एटली कुमारला 'जवान' या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. याशिवाय, सिद्धार्थ आनंदला 'पठाण' आणि करण जोहरला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाला.

या सोहळ्यास आलिया भट्ट, करीना कपूर, रणबीर कपूर, तृप्ती दिमरी, जान्हवी कपूर, सारा अली खान, हरनाज संधू, करिश्मा कपूर, कार्तिक आर्यन, वरुण धवन, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर, ओरहान अवत्रामणी, करण जोहर, सैयामी खेर यांच्यासह अनेक स्टार्स. राजकुमार राव, नर्गिस फाखरी, तेजस्वी प्रकाश यांनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातील सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचं अभिनंदन करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in