अखेर बादशाहने मागितली माफी, 'सनक' गाण्याचा वाद

हा वाद शिगेला पोचल्यानंतर अखेर बादशाहने या प्रकरणी जाहीर माफी मागितली
अखेर बादशाहने मागितली माफी, 'सनक' गाण्याचा वाद

गायक आणि रॅपर बादशाहचं एक गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. 'सनक' हे बादशाहचं गाणं सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं. पण या लोकप्रियतेला गालबोट लागलं . या गाण्यातील काही शब्दांविषयी बादशाहला ट्रोल करण्यात आलं आणि गाण्यावर आक्षेप घेतला गेला.

हा वाद शिगेला पोचल्यानंतर अखेर बादशाहने या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. तसंच लवकरच बदल केलेलं गाणं समोर येईल असंही सांगितलं.

काय म्हणाला बादशाह?

बादशाहने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले, "माझ्या निदर्शनास आले आहे की, माझ्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सनक या गाण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कधीही जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावणार नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने माझी कलात्मक निर्मिती आणि संगीत रचना तुमच्यासमोर आणत आहे. मी माझ्या गाण्यांचे काही भाग बदलले आहेत. कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर या गाण्याचे नवे व्हर्जन रिलीज करण्यात येईल. तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा ही नम्र विनंती. ज्यांच्या भावना मी नकळत दुखावल्या असतील त्यांची मी विनम्रपणे माफी मागतो. माझे चाहते माझे आधारस्तंभ आहेत आणि मी त्यांचा आदर करतो," असं म्हणत बादशाहने माफी मागितली आहे .

काय आहे वाद ?

गाण्यात रॅपरने महादेवाच्या नावाचा वापर केला आहे. महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याने आक्षेप घेतला. गाण्यात बदल न केल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा इशाराही पुजाऱ्याने दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in