Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या पत्नीविरोधात एफआयआर; नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची पत्नी गौरी खानविरोधात (Gauri Khan) एफआयआर दाखल झाला असून अडचणीत येण्याची शक्यता
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या पत्नीविरोधात एफआयआर; नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) अडचणीत सापडणार असल्याची शक्यता आहे. कारण, तिच्याविरोधात लखनौमध्ये (Lucknow) एफआयआर दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जसवंत शाह यांनी तुलसियांनी कन्स्ट्रक्शन आणि डेव्हल्पर्स लिमिटेड लखनौमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता. त्याची किंमत कोट्यवधीमध्ये असून त्यापैकी ८६ लाख रुपये त्यांनी दिले आहेत. तरीही त्याला फ्लॅट मिळाला नसल्याचा दावा जसवंत शाह यांनी केला.

गौरी खान ही तुलसियांनी कन्स्ट्रक्शन आणि डेव्हल्पर्स लिमिटेडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. यामुळे तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच, कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार आणि संचालक संचालक महेश तुलसियानी यांच्या विरोधातही एफआयआर दाखल केला. या तिघांविरोधात कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी तक्रादाराने म्हंटले की, " गौरी खानकडून झालेला प्रचार आणि प्रसार पाहून प्रभावित होऊन हा फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, आपली फसवणूक झाली आहे," यामुळे आता गौरी खानच्या डचांनी वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in