हातामध्ये पत्ते, पैसे... समोर सिगरेटची थोटकं आणि दारूची बाटली घेतलेला ओंकार भोजनेचा फोटो का होतोय व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाच्या टायमिंगने खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजनेचा फोटो व्हायरल
हातामध्ये पत्ते, पैसे...  समोर सिगरेटची थोटकं आणि दारूची बाटली घेतलेला ओंकार भोजनेचा फोटो का होतोय व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाच्या टायमिंगने खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजनेचा नवा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्या 'सरला एक कोटी' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता ओंकार भोजने हा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे.

'सरला एक कोटी' या नावातच चित्रपटाचे वेगळेपण आहे. या पोस्टरमध्ये ओंकार एका वेगळ्या लूकमध्ये दिसतो आहे. तसेच, त्याच्या हातामध्ये पत्ते असून पैसे लावून पत्ते खेळताना दिसतो. समोर, सिगरेटची थोटकं आणी दारूची बाटलीदेखील आहे. हा चित्रपट नक्की काय आहे? आणि यामध्ये ओंकारची भूमिका कशी असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. पोस्टरवर 'जो नशिबालाही डावावर लावतो तोच खरा गॅम्बलर' असे लिहिण्यात आलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in