New Historic Web Series of Sidhant Gupta: प्रसिद्ध चित्रपट निर्माता निखिल अडवाणी एक वेब सिरीज घेऊन येत आहे. मेकर्सनुसार या सिरीजमध्ये असा देशाचा इतिहास दाखवला जाणार आहे जो तुम्हाला माहीत नाही आणि तो जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. निखिलने यापूर्वी 'रॉकेट बॉईज' ही सिरीज आणली होती, ज्यामध्ये डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनातून भारताची अंतराळ आणि आण्विक क्रांती सखोलपणे दाखवण्यात आली होती. आता निखिल 'फ्रीडम एड मिडनाईट' (Freedom at Midnight) ही सिरीज घेऊन येत आहे. या सिरीजमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निवडणुकीपासून भारतात काय घडले याची कथा जवळून दाखवण्यात येणार आहे.
“१९४७ हे वर्ष भारताच्या इतिहासात नशिबाला आकार देणारे वर्ष म्हणून कोरले गेले आहे. देशाची वाटचाल बदलून टाकणाऱ्या घटनेची एक उत्कट, भावनिक कथा, 'फ्रीडम ॲट मिडनाईट' हा भारतीयांसमोर आपल्या स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या घटनांबद्दल संपूर्ण सत्य भारतीयांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. ज्या व्यक्तींनी आपल्याला नवा भारत दिला. ही एक कथा आहे जी प्रत्येक भारतीयाला माहित असायला हवी आणि माझ्या भागीदार मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी आणि स्टुडिओनेक्स्ट सोबत लेखकांच्या टीमसोबत ती सांगू शकलो याचा मला सन्मान वाटतो. ” निखिल अडवाणी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
कोणत्या पुस्तकावर आधारित आहे सिरीज?
डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या पुरस्कार-प्राप्त पुस्तकावर आधारित 'फ्रीडम अॅट मिडनाइट' या रोचक कथेची पहिली झलक सादर करत आहे.
लेखक आणि दिग्दर्शक कोण?
लवकरच सोनी लिव्हवर प्रसारित होणारी ही सिरीज स्टुडिओनेक्स्ट आणि सोनी लिव्ह यांच्यासोबत सहयोगाने एम्मी एंटरटेन्मेंट (मोनिषा अडवानी व मधू भोजवानी) द्वारे निर्मित आहे. निखिल अडवानी या शोचे शोरनर व दिग्दर्शक आहेत. अभिनंदन गुप्ता, अद्वितीय करेंग दास, गुनदीप कौर, दीव्या निधी शर्मा, रेवंता साराभाई आणि एथन टेलर यांनी कथानकाचे लेखन केले आहे.
कशी आहे स्टार कास्ट?
या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, जसे जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत सिद्धांत गुप्ता, महात्मा गांधी यांच्या भूमिकेत चिराग वोहरा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत राजेंद्र चावला, मुहम्मद अली जिना यांच्या भूमिकेत आरिफ जाकारिया, फातिमा जिना यांच्या भूमिकेत ईरा दुबे, सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत मलिष्का मेंडोन्सा, लियाकत अली खान यांच्या भूमिकेत राजेश कुमार, व्ही. पी. मेनन यांच्या भूमिकेत केसी शंकर, लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांच्या भूमिकेत ल्यूक मॅकगिबनी, लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्या भूमिकेत कॉर्डलिया बुगेजा, आर्चीबाल्ड वेव्हेल यांच्या भूमिकेत अॅलिस्टर फिन्ले, क्लेमेंट अॅटली यांच्या भूमिकेत अँड्र्यू कुलुम, सिरील रॅडक्लिफ यांच्या भूमिकेत रिचर्ड टेव्हरसन.
'फ्रीडम एड मिडनाईट' कधी आणि कुठे पाहू शकता?
तुम्ही ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर पाहू शकता. मात्र मेकर्सने अजून या सीरिजच्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.