पुन्हा एकदा येतायत 'फुकरे'! या तारखेला होणार 'फुकरे ३' प्रदर्शित

फुकरेचा तिसरा भाग मोठ्या पडद्यावर दिसणार असून यामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी दिसणार आहेत
पुन्हा एकदा येतायत 'फुकरे'! या तारखेला होणार 'फुकरे ३' प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंटने बॉलीवूडमधील सर्वात बहुप्रतीक्षित आणि यशस्वी कॉमेडी फ्रँचायझी 'फुकरे ३'च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. मृगदीप सिंग लांबाद्वारा दिग्दर्शित तसेच रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित 'फुकरे ३'या चित्रपटामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांना पाहायला मिळेल.

'फुकरे'ही एक यशस्वी फ्रँचायझी ठरली आहे. या फ्रँचायझीचा दुसरा भाग, 'फुकरे रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच, फ्रँचायझीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डिस्कव्हरी किड्स चॅनलवर 'फुकरे बॉईज' नावाची अ‍ॅनिमेटेड सिरीज तयार करण्यात आली. लहान मुलांसाठी चित्रपटातील अनोख्या पात्रांना टीव्ही स्क्रीनवर पुन्हा जिवंत केले. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल चाहता है', 'डॉन', 'डॉन २' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in