Fukrey 3 : 'फुक्रे ३'प्रेक्षकांच्या भेटीला ; प्रेक्षकांनी केला कौतूकांचा वर्षाव

'फुक्रे' आणि 'फुक्रे रिटर्न्स' हा दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.
Fukrey 3 : 'फुक्रे ३'प्रेक्षकांच्या भेटीला ; प्रेक्षकांनी केला कौतूकांचा वर्षाव

मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात चित्रपटांची जत्राचं भरली आहे . एका मागून एक अप्रतिम चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळताना दिसत आहे. अशातच एका चित्रपटाची खुप चर्चा रंगली आहे तो म्हणजे 'फुक्रे 3'. आज (२८ सप्टेंबर) फुक्रे-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'फुक्रे' आणि 'फुक्रे रिटर्न्स' हा दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. त्यामुळे या चित्रपटात देखील प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन होईल अशी आशा अनेकांना होती. ती आशा या चित्रपटाने पूर्ण केली आहे.

आज 'फुक्रे ३' या चित्रपटाने चित्रपटगृहात जबदस्त एंट्री मारून प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे . अनेक प्रेक्षकांनी हा सिनेमा कसा वाटला याबद्दल चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटवर शेयर केला आहे. ट्विट आणि चित्रपटाचा रिव्ह्यू बघून 'फुक्रे 3' ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे . काहींना रिचा चढ्ढाचा अभिनय आवडला तर काहींना चुचाचा चमत्कार. मात्र यावेळी चित्रपटात पंकज त्रिपाठीनं प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे.

एकाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "पंकज त्रिपाठीने चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. नेहमीप्रमाणेच त्याने मन जिंकली आहेत". तर दुसऱ्याने लिहिलंय आहे की, "जवान नंतर पाहण्यासारखा कोणता चित्रपट असेल तर तो हाच आहे, चित्रपट खूप चांगला आहे. नक्कीच जाऊन बघा". तर आणखी एकाने लिहिलंय आहे की," 'Fukrey 3' खूप मजेदार आहे. हा भाग चित्रपटाच्या फ्रँचायझीला नक्कीच न्याय देतो. चांगली पटकथा, काही विचित्रपणा, वन लाइनर.. सर्व कलाकार कॉमिक टायमिंग कमाल.. हा चित्रपट तुमचे मनापासून मनोरंजन करेल. सगळ्यांनी जाऊन बघा".

'फुक्रे 3' चित्रपटात पुलकित सम्राट, रिचा, वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केलं आहे, तर चित्रपटाची कथा विपुल विग यांनी लिहिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in