'फुकरे ३' मनोरंजनासाठी सज्ज! 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पहिल्या सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यावर 'फुकरे ३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे
'फुकरे ३'  मनोरंजनासाठी सज्ज! 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'फुकरे' या मल्टिस्टार सिनेमानं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची आतूरतेनं वाट पाहत आहेत. मात्र, आता या सिनेमाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. 'फुकरे' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. फुकरे हा सिनेमा या आधी ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला आता १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर 'फुकरे ३' या पुढच्या भागाची घोषणा करत रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. या सिनेमात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मंजोत सिंह आणि ऋचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत.

२०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'फुकरे' या सिनेमानं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. त्यानंतर २०१७ साली 'फुकरे रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पहिल्या सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यावर 'फुकरे ३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट समोर आली असून १ डिसेंबर २०२३ ला 'फुकरे ३' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

'फुकरे ३' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मृगदीप लांबा याने सांभाळली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या आधी हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र 'जवान' हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्यानं 'फुकरे ३' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in