'गदर -२' मोडतोय सर्वांचे रेकॉर्ड ; सहाव्या दिवसापर्यंत केली तब्बल 'एवढी' कमाई

आता फक्त 'पठाण' आणि 'सुलतानच' नाही तर टॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाला देखील 'गदर २' ने मागे टाकले आहे.
'गदर -२' मोडतोय सर्वांचे रेकॉर्ड ; सहाव्या दिवसापर्यंत केली तब्बल 'एवढी' कमाई

तब्बल २२ वर्षांनी सनी देओल आणि आमिषा पटेल यांनी 'गदर २'च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं. 'गदर २'ची घोषणा केल्यापासून प्रेक्षकवर्ग फार आतुरतेने या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. आता या चित्रपटाला रिलिज होऊन सहा दिवस उलटले आहेत. 'गदर 2' रिलीज झाल्यापासून हा चित्रपट रोज काही ना काही नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. या चित्रपटाने बुधवारी सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चक्क धुमाकूळचं घातला आहे.

बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड 'गदर 2' ने मोडून काढले आहेत. आता फक्त 'पठाण' आणि 'सुलतानच' नाही तर टॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाला देखील 'गदर २' ने मागे टाकले आहे. हा चित्रपट 7 दिवसात तब्बल 300 कोटींच्या पुढे कमाई करणार असं काहीसं चित्र बॉक्स ऑफिसवर सध्या दिसत आहे.

सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितलं तर सनी देओलच्या चित्रपटानं सहाव्या दिवशी 32.37 कोटींची कमाई केली. या आकडेवारी सोबतच 'गदर 2' ने भारतात एकूण 261.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात ऐकून 338 च्या जवळपास कमाई या चित्रपटाने केली आहे. 2023 चा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आता 'गदर 2' चं देखील नाव घेतलं जात आहे. 'गदर 2' ने पहिल्या दिवशी 40.1 , दुसऱ्या दिवशी 43.8, तिसर्‍या दिवशी तब्बल 51.7 , चौथ्या दिवशी 39 कोटींची कमाई केली होती., आता तर 'गदर २' लवकरच 500 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आणि चाहत्यांना आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in