'गदर २' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुचं ; तीन दिवसात केली तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई

तब्बल २२ वर्षांनी तारा सिंग आणि सकिनाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
'गदर २' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुचं ; तीन दिवसात केली तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई

बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांची चांगलीच शर्यत चालू आहे. कोण कोणावर भारी पडणार याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ११ ऑगस्ट रोजी सनी देओलचा 'गदर २' आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्यामध्ये सनी देओलच्या 'गदर २' ची मात्र सगळीकडे जोरदादर चर्चा चालू आहे. तब्बल २२ वर्षांनी तारा सिंग आणि सकिनाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

'गदर २' आणि 'ओह माय गॉड २' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडकल्याने याचा परिणाम कलेक्शनवर सुद्धा झाला आहे. दोन्ही चित्रपटांची कथा ही पूर्णत: वेगळी आहे. 'गदर 2' मध्ये प्रेमकहानी पाहायला मिळते, तर दुसरीकडे 'ओह माय गॉड २' मध्ये लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर मुद्या मांडला आहे. मात्र, या युद्धात सनी देओलच्या 'गदर 2' ने अक्षयच्या 'ओह माय गॉड २' ला मागे टाकत एक नवा विक्रम केला आहे.

सनी देओल आणि आमिषा पटेल या जोडीला 22 वर्षांपूर्वी 'गदर' या चित्रपटामधून प्रेक्षकांचे जे प्रेम आणि उत्साह मिळाला होता. तसंच प्रेम आणि उत्साह आता देखील 'गदर 2' ला मिळत आहे. पहिल्याच दिवशी 'गदर २' ने 45 कोटींची कमाई केली असून या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर शतक पुर्ण केले आहे. 40.10 कोटींच्या ग्रॅंड कलेक्शनसोबत ओपनिंग झालेल्या 'गदर 2' चा ओपनिंग वीकेंडही जबरदस्त ठरला. या चित्रपटाने 2023 च्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' आणि 'बाहुबली' चा विक्रमही मोडला असून 'गदर २' या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 43.08 कोटींचा गल्ला कमवला.

आताच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' ने तिसऱ्या दिवशी 51.50 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. याचबरोबर या तीन दिवसात 'गदर 2' या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 134 कोटी झाले आहे. या चित्रपटाने 'पठाण' आणि 'बाहुबली' सारख्या मेगा ब्लॉकबस्टर सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in