आता मोठ्या पडद्यावर दिसणार 'गांधी-गोडसे' या विचारांमधील युद्ध; हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शक

आता मोठ्या पडद्यावर दिसणार 'गांधी-गोडसे' या विचारांमधील युद्ध; हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शक

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तब्बल ९ वर्षांनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक या चित्रपटाची धुरा सांभाळणार आहे.
Published on

आपण आतापर्यंत महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यावर अनेक चित्रपट आणि नाटक पाहिले आहेत. महात्मा गांधी यांच्यावर फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चित्रपट आले आहेत. तर, शरद पोंक्षे यांचे नथुराम गोडसे हे नाटक सर्वांनाच परिचित आहे. आता पुन्हा एकदा या दोन विचारांमधील युद्ध मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाची धुरा प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी सांभाळणार आहेत. नुकतेच या चित्रपटाची घोषणा झाली असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरदेखील असणार आहे. तब्बल ९ वर्षांनी राजकुमार संतोषी हे दिग्दर्शक म्हणून दिसणार आहेत. त्यांनी दामिनी, घातक, घायल, खाकी, अजब प्रेम की गजब कहानी आणि अंदाज अपना अपना सारखे प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. यामध्ये ए आर रहमानने संगीत दिले असून अभिनेता पवन चोप्रादेखील या चित्रपटामध्ये असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी ही या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in