Gandhi- Godse Ek Yudh : 'काश्मीर फाईल्स'नंतर चिन्मय मांडलेकर दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत

नुकतेच राजकुमार संतोषी यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या (Gandhi- Godse Ek Yudh) सिनेमाचा एक छोटा टिझर प्रदर्शित झाला
Gandhi- Godse Ek Yudh : 'काश्मीर फाईल्स'नंतर चिन्मय मांडलेकर दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत
Published on

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi- Godse Ek Yudh) या चित्रपटाची घोषणा केली. यामध्ये नथुराम गोडसेची भूमिका कोण साकारणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. तर आता यावरून पडदा उठला असून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसे ही भूमिका साकारत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी एक छोटा टिझर देत ही माहिती दिली आहे. बॉलिवूडमध्ये 'काश्मीर फाईल्स'मध्ये एक निगेटिव्ह भूमिका केल्यानंतर आता त्याचे चाहते या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. चिन्मय नेहमीच त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असतो. त्यामुळे त्याने स्वीकारलेल्या या भूमिकेमुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. याआधी शरद पोंक्षे यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. तसेच, महात्मा गांधींच्या भूमिकेत अभिनेता दीपक अंतानी दिसणार आहेत. हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे यांच्या विचारांमधील युद्धावर आधारित असणार आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूर हे कलाकारदेखील या सिनेमात झळकणार आहेत.

'गांधी-गोडसे एक युद्ध' चित्रपटाची धुरा प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी सांभाळणार आहेत. ते तब्बल ९ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. यामध्ये ए आर रहमानने संगीत दिले आहे. तसेच, राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी ही या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in