गौतमी देशपांडेला आला भयानक अनुभव ; पोस्ट शेअर करत दिली संतप्त प्रतिक्रिया

गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कामाचं मानधन वेळेवर न मिळाल्याने अभिनेत्रीने संतप्त अशी एक पोस्ट शेअर केली आहे.
गौतमी देशपांडेला आला भयानक अनुभव ; पोस्ट शेअर करत दिली संतप्त प्रतिक्रिया

चित्रपट सृष्टीमधील कलाकार दररोज जवळपास दहा ते बारा तास काम करत असतात. चित्रपट आणि मालिकांच्या सेटवर अनेकदा त्यांना धावपळ करावी लागते. रात्र बघत नाहीत कि दिवस ते फक्त आपल्या कामाला प्राधान्य देतात. मात्र, एवढी मेहनत करूनही कलाकारांना वेळेवर त्याचं मानधन मिळत नाही. तीन ते चार महिने होऊन देखील हक्काचे पैसे मिळत नाहीत. अश्या घटना अनेक कलाकारांसोबत झाल्या आहेत. असाच एका कलाकारचा अनुभव सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेला हा अनुभव आला आहे.

गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कामाचं मानधन वेळेवर न मिळाल्याने अभिनेत्रीने संतप्त अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणाली की, "जेव्हा पैशांचा प्रश्न येतो…तेव्हा लोक असं वागतात. मला या क्षणी अतिशय वाईट वाटतंय. आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला असा मिळतो आणि स्वत:च्या पैशांसाठी लोकांकडे पाठपुरावा करावा लागतो."

दरम्यान, गौतमीने या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. फक्त कामाचा मोबदला मिळावी ही तिची मागणी आहे. याआधी शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊतस, संग्राम समेळ यांसारख्या कलाकारांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in