Gautami Patil : सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली ; चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

नवरात्रोत्सव(Navratri) काळात सोलापूरच्या स्थानिक डिजिटल वाहिनीने 'डिस्को दांडिया' कार्यक्रमात गौतमी पाटीलला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.
Gautami Patil : सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली ; चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलची(Gautami Patil) सर्वत्र मोठी क्रेज पाहायला मिळते. एखाद्या राजकारणी, सेलिब्रिटी किंवा मराठी मनोरंज क्षेत्रातील कलाकारही जमवू शकणार नाहीत एवढी गर्दी एकटी गौतमी पाटील जमा करते. तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. या गर्दीत अनेकदा राडा देखील होते. अनेक जण गोंधळ घालतात. दगडफेक तसंच खुर्च्यांची तोडफोड झाल्याच्या देखील घटना गौतमीच्या कार्यक्रमात घडल्या आहेत.

गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याने अनेक उतावीळ महाभागांना पोलिसांच्या काठ्या देखील खाव्या लागल्या आहेत. अलिकडच्या काळात गौतमीचा कार्यक्रम आणि राडा हे जणू समिकरणच झालं आहे. परिणामी पोलिसांकडून तिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारल्याच्या देखील घडत आहेत. नुकताच सिंधुदुर्ग पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता सोलापूर पोलिसांनीही(Solapur police) गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे.

नवरात्रोत्सव(Navratri) काळात सोलापूरच्या स्थानिक डिजिटल वाहिनीने 'डिस्को दांडिया' कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमास गौतमी पाटीलला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला पवानगी नाकारली आहे. नवरात्रोत्सवकाळात पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. गौतमीच्या कार्यक्रमास अधिकचा बंदोबस्त पुरविण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणं शक्य नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in