गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, आयोजकांवर गुन्हा... काय आहे नेमकं कारण ?

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं
गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, आयोजकांवर गुन्हा... काय आहे नेमकं कारण ?

सध्या महाराष्ट्रात 'सबसे कातील गौतमी पाटील' या नावाची सर्वत्र चर्चा आहे. गौतमी आणि गर्दी हे जणू समिकरणच झालं आहे. राज्यभरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जात आहे. अगदी गावखेड्यात देखील गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. तिच्या नावाची एवढी क्रेझ वाढली आहे की तिच्या चाहत्यांनी बायको, मुलांच्या वाढदिवसाला, घराच्या पुजेला तिच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तर चक्क शर्यतीच्या बैलासाठी गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गौतमीचा कार्यक्रम झाला आणि राडा झाला नाही. असं तर होणार नाही. तिचा कार्यक्रम पोलिसांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अनेकदा पोलिसांना प्रेक्षकांवर सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. दरम्यान, आता पुणे जिल्ह्यातील आमदाराच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं आयोजन करण आयोजकांना चांगलंच महागात पडलं आहे.

पुण्याच्या चाकणमधील मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली नसतानाही आयोजकांनी कार्यक्रम घेतला. त्यामुळे आयोजक समीर गवारे, आनंद गवारे आमि विश्वनाथ गवारेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील कार्यक्रम आयोजित केल्याने तसंच निर्धारित वेळेपेक्षा जास्तवेळ कार्यक्रम सुरु ठेवल्याने हे गुन्हे दाखल केले गेले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in