मलाही आरक्षण हवंय, कुणबी प्रमाणपत्र हवंय - गौतमी पाटील

गौतमीने दिलेल्या प्रतिक्रियेवरून काही जण तिचं कौतूक करत आहेत, तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
मलाही आरक्षण हवंय, कुणबी प्रमाणपत्र हवंय - गौतमी पाटील

नृत्यांगणा गौतमी पाटील ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्तेत असते. अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली आहे. अगदी कमी वेळेत गौतमीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना गौतमीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तीची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

गौतमी तुला आरक्षणाविषयी काय वाटते,असा प्रश्न पत्रकारांनी गौतमी पाटीलला विचारला असता. त्यावेळी तिने दिलेलं उत्तर हे चर्चेचा विषय ठरत आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना गौतमी म्हणाली, साहजिकच आहे. आज प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण हवं आहे. कुणबी प्रमाणपत्र हवं आहे.गौतमीने दिलेल्या या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गौतमी पाटीलने यापूर्वी देखील अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.तीच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ उडाल्याने ती वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद जास्त असल्याने काही अतिउत्साही तरुणांकडून गोंधळ देखील घातल्याच्या घटना घडल्या असल्याने अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांवर बंदी देखील घालण्यात आली आहे. दरम्यान, गौतमीने आरक्षणासारख्या मुद्याला समर्थन दिल्याने तिची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. तिने दिलेल्या या प्रतिक्रियमुळे तिच्या चाहत्यांनी दिला धन्यवाद देत तिचं कौतूक केलं आहे.तर या मुद्यावरुन काहीजण तिला ट्रोल देखील करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in