का होतोय #BoycottShahRukhKhan सोशल मीडियावर ट्रेंड?

बऱ्याच वर्षांनंतर बॉलीवूड किंग खान शाहरुख खान 'पठाण' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता त्याच्यामागे पुन्हा एकदा बॉयकॉटचा ट्रेंड सुरु झाला.
का होतोय #BoycottShahRukhKhan सोशल मीडियावर ट्रेंड?
Published on

बॉलिवूडचा किंग खान बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, त्याचा बहुचर्चित 'पठाण' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा सिनेमाही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर सध्या #BoycottShahRukhKhan चा ट्रेंड सुरु आहे. मात्र, यामागे आणखी एक कारण समोर आले आहे. शाहरुख खानचा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबतच एक फोटो वायरल होत आहे. हे पाहून अनेकांनी शाहरुख खानला बॉयकॉट करा असे म्हणत #BoycottShahRukhKhan ट्रेंड करत आहेत. आधी 'पठाण'मधील एका गाण्यामुळे वादंग सुरु असताना या फोटोमुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा होते आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी अनेकदा भारतविरोधी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे शाहरुख खान आणि इमरान खान यांचा एकत्र फोटो पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. साल २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटानंतर शाहरुख ४ वर्षे मुख्य अभिनेता म्हणून कोणताही मोठा चित्रपट आला नव्हता. त्यांनतर आता २०२३मध्ये 'पठाण'मध्ये त्याची मुख्य भूमिका आहे. मात्र, आता यातील एक गाणे प्रदर्शित झाले आणि पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोणला ट्रॉल करण्यात आले. कारण, दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. एकीकडे चित्रपट आणि दुसरीकडे व्हायरल होत असलेल्या फोटो यामुळे शाहरुख खान चांगलाच ट्रोल होतो आहे.

logo
marathi.freepressjournal.in