कोवळ्या उन्हात लेकरांसोबत मस्ती, जिनिलीयाने शेअर केला व्हिडिओ

जिनिलीयाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
कोवळ्या उन्हात लेकरांसोबत मस्ती, जिनिलीयाने शेअर केला व्हिडिओ

महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून ओळखल्या जाणारे रितेश व जिनिलीया देशमुख हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. जिनिलीया सध्या लातूरच्या घरी गेलेली आहे. तिने नुकतेच शेअर केलेले काही फोटो सध्या चर्चेत आले आहेत. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमूळे रितेश- जिनिलीया आपल्या मुलांसह लातूरला गेले आहेत. अभिनेत्रीने लातूरमधून कुटुंबीयांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात सकाळच्या कोवळ्या उन्हात ती आपल्या दोन्ही मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. तिने इस्टाग्रामला व्हिडीओ स्टोरी शेअर केली आहे. दरम्यान, जिनिलीयाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

PM

जिनिलीया ती शेवटची ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटात झळकली होती. आता येत्या काही वर्षांत जिनिलीया आणखी काही नवनवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in