हेमा मालिनी पहिल्यांदाच अयोध्येत जाणार, प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'हा' खास परफॉर्मन्स होणार

संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
हेमा मालिनी पहिल्यांदाच अयोध्येत जाणार, प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'हा' खास परफॉर्मन्स होणार
PM
Published on

संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी संपूर्णपणे सजवून टाकली आहे. अयोध्येत भाजपच्या खासदार आणि बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांचा खास परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला आहे. रामायणावरील नृत्यनाटिका त्या सादर करणार आहेत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

मी पहिल्यांदाच अयोध्येत येणार -

"जय श्रीराम... मी पहिल्यांदाच अयोध्येत येणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मी अयोध्येला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. 14 ते 22 जानेवारी दरम्यान जगत गुरु पद्म विभूषण तुलसी पीठाधीश्वर जगत गुरू रामनंद स्वामी रामभद्राचार्य यांचा 75 वा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुदेव यांच्या जन्मोत्सावचं औचित्य साधत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान मी माझ्या टीमसह 17 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता रामायणावर आधारित नृत्यनाटिका सादर करणार आहे. नृत्यनाटिका पाहायला अयोध्येत नक्की या", असे हेमा मालिनेने व्हिडिओत म्हटले आहे. त्यामुळे आता 'ड्रीम गर्ल'चे सादरीकरण पाहायला चाहते नक्कीच उत्सुक असतील.

प्राणप्रतिष्ठा मुहूर्त -

22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शूभमुहूर्त असेल.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित-

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक कलाकार उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, रजनीकांत, धनुष, यश, प्रभास, राम चरणसह अरुण गोविल आणि दीपिका चिखलियासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in