गौतमी पाटीलवर टीका करणाऱ्यांना तिच्या वडिलांचं उत्तर; म्हणाले...

गौतमीच्या नृत्यावर होणाऱ्या टीकेवर तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमी पाटीलवर टीका करणाऱ्यांना तिच्या वडिलांचं उत्तर; म्हणाले...

राज्यात सध्या सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तिच्या चाहत्यांचा उत्साहाला पारावारा उरत नाही. यासाठी पोलिस बळाचा वापर करणे तर नित्याचं झालं आहे. अनेक ठिकाणीतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. सुरुवातीला गौतमी पाटीलचे हावभाव अश्लील असल्याची टीका तिच्यावर झाली. यानंतर तिने प्रमाणिकपणे सर्वांची माफी देखील मागीतली. अनेकांनी तिने लावणीला बदनाम केल्याचा ठपका तिच्यावर ठेवला. यावर तिने आपलं नृत्य हे 'लावणी' नसून आपण 'डिजे शो' करत असल्याचं स्पष्ट केलं.

गौतमीने झालेल्या चुकांबद्दल प्रामाणिकपणे माफी मागितल्यानंतर देखील तिच्यावर होणारी टीका सुरुच आहे. अनेकांनी ती महाराष्ट्राचा बिहार करत असल्याची देखील टीका केली. गौतमीच्या नृत्यावर होणाऱ्या टीकेवर तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. लोकांचं काय, लोक घोड्यावर देखील बसू देत नाही आणि पायी देखील चालू देत नाही, असं गौतमीच्या वडिलांनी म्हटले आहे. एकप्रकारे त्यांनी आपल्या लेकीची पाठराखण केली आहे.

रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील असं गौतमी पाटीलच्या वडिलांचं नाव आहे. ते गेल्या 18 ते वीस वर्षापासून वेगळं राहतात. त्यांना गौतमीचा डान्स बघितला का? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी घरात टीव्ही नसल्याचं सांगितलं आहे. पण दुसऱ्यांच्या फोनमध्ये तिचा डान्स बघितला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तिचा डान्स आवडतो, पण थोडं वाईटही वाटत असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी गौतमीवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. टीका करणाऱ्यांनी तिला अशा पद्धतीने बोलायला नको.. मी मुलीच्या बाजूने आहे. ती काही वाईट करतेय का? असा सवाल देखील टीकाकारांना विचारला आहे. टीका करणारे भरपूर असतात. कुणी घोड्यावर बसू नको म्हणतं, तर कुणी पायी चालू नको म्हणतं. लोक काही ना काही बोलत असतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

गौतमीचे वडील हे सुरुवातीला कामानिमित्त पुण्याला होते. आता त्यांचा मुक्काम जळगाव येथे आहे. मागील 20 वर्षापासून ते वेगळे राहतात. गौतमीच्या डान्स बद्दल तिच्या वडिलांना कुठलाही आक्षेप नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच तिच्या पाटील आडनावावरुन त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी गौतमी 'पाटील' घराण्यातील आहे, असं सांगतलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in