लोकप्रिय टिव्ही कलाकार पवन सिंहचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; वयाच्या २५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पवन हा मुळचा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील असून तो कामानिमित्त आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होता.
लोकप्रिय टिव्ही कलाकार पवन सिंहचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; वयाच्या २५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. साऊथचा लोकप्रिय अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंहने वयाच्या 25 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पवन सिंहचं काल (18 ऑगस्ट) निधन झालं.

पवन हा मुळचा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील असून तो कामानिमित्त आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार पवनचा मृतदेह मुंबईतून त्याच्या मूळ गावी मांड्या येथे नेण्यात येणार असून त्याठिकाणी त्याच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

पवनच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या संपूर्ण परिवाराला आणि त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला की दुसरे काही कारण होते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

पवनच्या निधनावर त्याच्या चाहत्यांबरोबरचं अनेक कलाकार आणि राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. ज्यात मंड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार केबी चंद्रशेखर, माजी आमदार बी प्रकाश, माजी मंत्री केसी नारायण गौडा, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष बीएल देवराजू, विजया रामेगौडा, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी नागेंद्र कुमार, काँग्रेस नेते बुकनाकेरे अश्या इतर लोकांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in