ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट रेडफर्ड यांचे निधन

हॉलिवूडचे ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखले जाणारे, ऑस्कर विजेते दिग्दर्शक, उदारमतवादी कार्यकर्ते आणि स्वतंत्र सिनेमाला नवे दालन देणारे रॉबर्ट रेडफर्ड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट रेडफर्ड यांचे निधन
Published on

प्रोव्हो : हॉलिवूडचे ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखले जाणारे, ऑस्कर विजेते दिग्दर्शक, उदारमतवादी कार्यकर्ते आणि स्वतंत्र सिनेमाला नवे दालन देणारे रॉबर्ट रेडफर्ड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

रेडफर्ड यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मात्र, मृत्यूचे कारण सांगण्यास त्यांच्या निकटवर्तीयांनी नकार दिला. १९६०च्या दशकात स्टारडमला पोहोचलेले रेडफर्ड ७०च्या दशकात सर्वात मोठे अभिनेते बनले. ‘द कँडिडेट’, ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ आणि ‘द वे वी वेअर’ यासारख्या चित्रपटांनंतर त्यांनी १९८० मध्ये ‘ऑर्डिनरी पीपल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर जिंकला. रेडफर्ड यांनी राजकीय सक्रियता, कमी ग्लॅमर असलेल्या भूमिका स्वीकारणे आणि स्वतंत्र चित्रपटांसाठी व्यासपीठ उभे करण्याच्या बांधिलकीतून स्वतःला अधिक मोठा कलाकार म्हणून सिद्ध केले. ७० नंतर रेडफर्ड यांचे अभिनय क्षेत्रातील कामकाज थोडे कमी झाले.

logo
marathi.freepressjournal.in