'Mirzapur' Season 3: मिर्झापूर ३ झाला रिलीज; प्राइम व्हिडीओवर 'अशी' बघा फ्रीमध्ये वेब 
सिरीज
@yehhaimirzapur/ Instagram

'Mirzapur' Season 3: मिर्झापूर ३ झाला रिलीज; प्राइम व्हिडीओवर 'अशी' बघा फ्रीमध्ये वेब सिरीज

Mirzapur 3 on Amazon Prime: खूप मोठ्या प्रतिक्षेनंतर मिर्झापूर सीझन ३ अखेर अमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. पण तुम्ही प्राइम मेंबर नसलात तरीही तुम्ही या मालिकेचा मोफत आनंद घेऊ शकता.

Mirzapur Season 3 OTT Release: मिर्झापूर या गाजलेल्या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीजनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज ५ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. तिसरा सीझन आणण्यासाठी निर्मात्यांना ४ वर्षे लागली. यंदा सिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि विजय वर्मा भूमिका साकारत आहेत. मिर्झापूरचा सीझन ३ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सिरीज आहे. ही सिरीज प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. पण तुम्ही प्राइम मेंबर नसलात तरीही तुम्ही या मालिकेचा मोफत आनंद घेऊ शकता. मिर्झापूर सीझन ३ मोफत पाहायचा असेल तर आम्ही तुमची मदत करणार आहोत.

मोफत कशी पाहायची सिरीज?

  • अमेझॉन प्राइम व्हिडीओ नवीन वापरकर्त्यांसाठी एक महिना विनामूल्य टेस्टिंग देते. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड तुमच्या अमेझॉन खात्यात जोडावे लागेल.

  • हे लक्षात ठेवा की तुम्ही अमेझॉन डॉट कॉम कॉर्पोरेट क्रेडिट लाइन, चेकिंग खाते, प्रीपेड क्रेडिट कार्ड इत्यादींचा वापर त्या अमेझॉन खात्यावरील विनामूल्य टेस्ट करू शकणार नाही.

  • या टेस्टिंग ट्रायल सोबत तुम्ही विनामूल्य मिर्झापूर ३ ही वेब सिरीज पाहू शकता.

'Mirzapur' Season 3: मिर्झापूर ३ झाला रिलीज; प्राइम व्हिडीओवर 'अशी' बघा फ्रीमध्ये वेब 
सिरीज
Mirzapur Season 3: 'मिर्झापूर'च्या जंगलात होणार पुन्हा लढत, नवीन सीजन 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सबस्क्रिप्शनसह 'मिर्झापूर 3' कसा पाहायचा?

  • तुमच्या डिव्हाइसवर प्राइम व्हिडीओ ॲप डाउनलोड करून घ्या.

  • तुमच्या आवडीची सबस्क्रिप्शन प्लॅन निवडा आणि पेमेंट करा.

  • पेमेंट केल्यानंतर सर्च बारवर जा आणि मिर्झापूर ३ टाइप करा.

  • आता तुमचा आवडता स्नॅक निवडा, प्ले बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांसोबत किंवा एखाद्या खास व्यक्तीसोबत त्याचा आनंद घ्या.

logo
marathi.freepressjournal.in