Fighter : हृतिक रोशनने सुरु केले आगामी चित्रपट 'फायटर'चे शूटिंग

हृतिक रोशनने 'विक्रम वेधा'या चित्रपटात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Fighter : हृतिक रोशनने सुरु केले आगामी चित्रपट 'फायटर'चे  शूटिंग

'फायटर' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच, या चित्रपटाबद्दल एक नवा उपडेट समोर आला आहे. सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांनी आगामी चित्रपट 'फायटर'चे शूट अखेरीस सुरू केले आहे. 'विक्रम वेधा'ला मिळालेल्या यशानंतर हृतिक रोशनने अखेर फायटर या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

फायटरची निर्मिती करणाऱ्या मार्फ्लिक्स प्रॉडक्शनने हृतिक रोशनसह दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा शूटिंगसाठी निघालेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले “आणि सुरुवात झाली….

#FIGHTER”

अलीकडेच, हृतिक रोशनने 'विक्रम वेधा'या चित्रपटात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याशिवाय, 'अल्कोहोलिया'या हे गाणे रिलीज झाल्यापासून गाण्यामध्ये त्याच्या डान्सने सर्वांना वेड लावले आहे. आता हृतिक रोशनने फायटरचे शूटिंग सुरू केले असून, त्याला पाहण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in