मुंबई : आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर' चित्रपटानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित एक नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मला काहीतरी सांगायचंय’ असे या नाटकाचे नाव आहे. शिंदे यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या नाटकातून शिवसेनेतल्या फुटीसंबंधात कोणकोणत्या नवीन घटना पुढे येतात याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.
लेखक प्रदीप धवल यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचेच आता नाट्यरूपांतर करण्यात आले आहे. या नाटकात शिंदे यांचे बंड आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही धक्कादायक माहिती लोकांसमोर आणली जाणार असल्याची शक्यता आहे.
याआधी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाची निर्मिती शिंदे यांनी केली होती. या चित्रपटाबद्दलही त्यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ‘मला काहीतरी सांगायचंय’ हे नाटक एकपात्री असणार असून या नाटकात मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहे.