'इन दिनों.. लाइफ इन अ मेट्रो' चे प्रदर्शन लांबणीवर , आता 'या' तारखेला होणार रिलीज; टी सीरिजची माहिती

हा चित्रपट या वर्षी मार्च महिन्याच्या 29 तारखेला चित्रपटगृहात रिलीज होणार असल्याची चर्चा होती परंतू निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.
'इन दिनों.. लाइफ इन अ मेट्रो' चे प्रदर्शन लांबणीवर , आता 'या' तारखेला होणार रिलीज; टी सीरिजची माहिती

दिग्दर्शक अनुराग बासू यांनी 'लाइफ इन अ मेट्रो' या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अनुराग बासू यांचा आगामी चित्रपट 'मेट्रो.. इन दिनो' हा चर्चेत आहेत. पण आता या चित्रपटासंदर्भात एक अपडेट पुढे आली आहे. प्रेक्षकांना अजून काही काळ या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट या वर्षी मार्च महिन्याच्या 29 तारखेला चित्रपटगृहात रिलीज होणार असल्याची चर्चा होती परंतू निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.

हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 13 सप्टेंबर 2024 ला येणार आहे. टी सीरिजने या संदर्भात माहिती दिली. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार आहे. सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेनशर्मा, अली यांचा समावेश आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजचे भूषण कुमार आणि अनुराग बासू प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे. यात प्रीतम यांचे शानदार संगीत असणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या बाबतीत उत्सुकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in