IND vs NZ WC 23 : वानखेडेवर सेमीफायनल पाहायला सुपरस्टार रजनीकांतसह अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी लावणार हजेरी?

साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींबरोबरच बॉलीवूडमधील काही दिग्गज सेलिब्रेटी भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमी फायनलला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे
IND vs NZ WC 23 : वानखेडेवर सेमीफायनल पाहायला सुपरस्टार रजनीकांतसह अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी लावणार हजेरी?

आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्युझीलंड असा सामान होणार आहे. आता पर्यंत ज्या सामन्याची कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहते वाट पाहत होते. तो सामना आज अखेर पार पडणार आहे. भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. हा सामना आता सुरु झाला आहे . तर सगळे चाहते फार उत्सुकतेने हा सामना पाहत आहेत .

भारत विरुद्ध न्युझीलंड या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आज उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मधील सेमीफायनला सामना आज वानखेडे स्टेडिमयवर भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलीवूड,टॉलीवूडमधील विविध सेलिब्रेटी वानखेडेवर हजर आहेत. त्याच चर्चा आहे ती सुपरस्टार रजनीकांत यांची आहे. हा सामना पाहण्यासाठी थलायवा मुंबईत दाखल झाले आहेत . याशिवाय रणवीर सिंग, अनुष्का, दीपिका हे देखील या सामन्याला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींबरोबरच बॉलीवूडमधील काही दिग्गज सेलिब्रेटी भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमी फायनलला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या सान्याची जोरदारसगळीकडे चर्चा आहे. हा सामना पाहण्यासाठी बॉलीवूडचा भाईजान सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान देखील या सामन्याच्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याही यावेळी प्रेक्षकांच्या भूमिकेत असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in