
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, अमेझॉन प्राइमची 'ब्रीद: इनटू द शॅडोज' मालिकेचा सीझन २ प्रदर्शित झाली असून आपल्या अनोख्या कथानकाने दर्शकांची मने जिंकत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अनेक मनोरंजक पात्रे उलगडताना दिसली, तर दुसऱ्या सीझनमध्ये यांचा विश्लेषणाने नवी पातळी गाठली. विशेषत: अभिषेक बच्चन या मालिकेत अविनाश आणि जयच्या दुहेरी भूमिका साकारत आहे.
दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्याने खऱ्या अर्थाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे, त्याने या सखोल आणि मनोरंजक पात्राच्या तयारी मागची त्याची भूमिका स्पष्ट केली. आपल्या पात्राच्या तयारीबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, "मी आणि मयंक, आम्ही जवळपास चार वर्षांपासून बोलत होतो आणि असा एकही क्षण गेला नाही जेव्हा मी त्याला माझ्या पात्राविषयी प्रश्न विचारला आणि त्याच्याकडे उत्तर नव्हते. इतकी त्याची तयारी होती. मयंक आणि मी प्रत्येक गोष्टीच्या तयारीसाठी बरेच दिवस घालवले कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीची चोख योजना करायची होती जेणेकरून आम्ही सेटवर फक्त सीन अंमलात आणू शकू. आम्हाला खूप काही एक्सप्लोर करायचे होते आणि त्यासाठी आम्हाला सेटवर आमचा वेळ घालवायचा नव्हता. आम्ही अविनाश आणि जे वर काम करत अनेक दिवस घालवले आहेत आणि यातील गोष्टी कशा घडतील, अविनाश आणि जे एकाच वेळी कसे वेगळे आणि एकच दिसतील. १० वर्षांनंतरही ते कसे असतील याचा आम्ही खोलवर विचार केला. म्हणूनच मयंकने मला व्यक्तिरेखांवर सखोलपणे काम करण्यास सांगितले."
अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची हि मालिका मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केली असून, अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत सीझन 2ची सह-निर्मितीदेखील केली आहे. 'ब्रीद: इनटू द शॅडोज' सीझन २ हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, नवीन कस्तुरिया, सैयामी खेर आणि इवाना कौर हे कलाकार भूमिकेत आहेत. 'ब्रीद: इनटू द शॅडोज' हि बहुप्रतीक्षित मालिका ९ नोव्हेंबरपासून भारत आणि जगभरातील २४० देशांमध्ये प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे.