Video :आयरा अन् नुपूरच्या रिसेप्शनला अनेक दिग्गजांची हजेरी; शिंदेपासून ते ठाकरेंपर्यंत अनेक राजकीय मंडळी होती उपस्थित

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Video :आयरा अन् नुपूरच्या रिसेप्शनला अनेक दिग्गजांची हजेरी; शिंदेपासून ते ठाकरेंपर्यंत अनेक राजकीय मंडळी होती उपस्थित

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांचे उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. त्यानंतर काल संध्याकाळी मुंबईत या जोडप्याचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सिनेक्षेत्रातील कलाकारांपासून ते राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

राजकीय नेत्यांची उपस्थिती-

आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावून आयरा खान आणि नुपूर शिखरे यांना शुभेच्छा दिल्या. याच बरोबर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच, मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी देखील हजेरी लावली.

बॉलीवूड सेलिब्रिटींनी लावली हजेरी-

राजकीय नेत्यांसह या सोहळ्याला बॉलीवूडमधील सलमान खान, शाहरुख खान, जया बच्चन, श्वेता बच्चन, सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी,रेखा, अनिल कपूर या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. त्यांचे या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आयरा आणि नुपूर यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले.

logo
marathi.freepressjournal.in