लेकीच्या लग्नात इमोशनल झाला आमिर, गायलं 'फूलों का तारों का' गाणं अन्...

आयरा आणि नुपूर हे उदयपुरमध्ये पारंपारीक रिती-रीवाजाने लग्न करणार आहेत. या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. आमिरचा गायनाचा व्हिडिओ समोर आला आहे.
लेकीच्या लग्नात इमोशनल झाला आमिर, गायलं 'फूलों का तारों का' गाणं अन्...

अभिनेता आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानने फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. यानंतर आयरा आणि नुपूर हे उदयपुरमध्ये पारंपारीक रिती-रीवाजाने लग्न करणार आहेत. या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. उदयपुरच्या ताज अरावली हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या लग्नाची सुरुवात मेहंदीने झाली असून या जोडप्याची संगीत सेरेमनी ठेवण्यात आली होती. वधूच्या वडिलांनी म्हणजेच आमिर खानने या कार्यक्रमात आपल्या मुलीसाठी खास गाणं गायलं, आमिरच्या गायनाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. इरा आणि नुपूरच्या संगीत सेरेमनीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आमिर खान त्याच्य पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद या तिघांनी नवरी इरासाठी एक खास गाणं गायलं. यावेळी आमिर भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

आफरीन आफरीन' या गाण्यावर नूपूर आणि इरा यांनी शानदार एन्ट्री केली. इराने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता. नुपूर ग्रे कलरच्या सूटमध्ये स्मार्ट दिसत होता. इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड, वांद्रे येथे कोर्ट मॅरेज केलं. मीडिया वृत्तानुसार, नुपूर आणि इरा कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान भेटले होते.. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांची एंगेजमेंट पार्टी झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in