मराठी सिनेमामध्ये ईशा अगरवालचे दमदार पर्दापण

ईशा एक फिटनेसप्रमी आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्सरही असून सौंदर्य, आरोग्य, फिटनेस आणि जीवनशैली क्षेत्रातील काही प्रतिष्ठित ब्रँड्ससाठी काम करत आहे
मराठी सिनेमामध्ये ईशा अगरवालचे दमदार पर्दापण

आपल्या मनोरंजन करिअरमध्ये विविध मानसन्मान मिळवणारी मुंबईची सौंदर्यवती ईशा अगरवालचं वर्णन महत्त्वाकांक्षी, निश्चयी आणि प्रतिभावान या तीन शब्दांत अगदी नेमकेपणानं करता येईल. 1 जुलै 2022 रोजी प्रदर्शित झालेला मल्टी- स्टारर मराठी सिनेमा झोलझाल एक धमाल विनोदी सिनेमात तिनं प्रमुख भूमिका साकारली आहे. महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये लहान गावात जन्मलेल्या ईशानं अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये स्वतःची ओळख तयार केली आहे. पारंपरिक विचारांच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि या क्षेत्राची काहीच माहिती किंवा गॉडफादर नसलेल्या ईशानं सगळ्या आव्हानांचा सामना केला व आज तिचा नवा सिनेमा तिच्या आयुष्यात नवी सुरुवात घेऊन आला आहे. या सौंदर्यवतीनं आतापर्यंत काही हिंदी सिनेमांतही काम केलं असलं, तरी महाराष्ट्रीय संस्कृती व विचारांतून तिने प्रदर्शित होणारा आपला पहिला सिनेमा मराठी असेल याची काळजी घेतली. 

 ईशा एक फिटनेसप्रमी आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्सरही असून सौंदर्य, आरोग्य, फिटनेस आणि जीवनशैली क्षेत्रातील काही प्रतिष्ठित ब्रँड्ससाठी काम करत आहे. तिला भटकंतीची आवड असून नृत्य आणि गायनाचा ती मनसोक्त आनंद घेते. तिला आव्हानात्मक भूमिका तसेच दमदार व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा असून संधी मिळाल्यास खलनायिकेची भूमिका करायलाही ती उत्सुक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in