Jaane Jaan : करीना करणार ओटीटीच्या माध्यमातून कमबॅक ; 'जाने जान' चा टिझर रिलीज, वाढदिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

करीना कपूरचा आमिर खान सोबतचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठऱला होता.
Jaane Jaan : करीना करणार ओटीटीच्या माध्यमातून कमबॅक ; 'जाने जान' चा टिझर रिलीज, वाढदिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीन कपूर ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजवर आपल्या अभिनयाच्या आणि नृत्यच्या बळावर ती प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. करीनानं आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवासांपासून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कागिरी करु शकलेले नाहीत. तिचा आमिर खान सोबतचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठऱला होता. अशात करीनाने ओटीटीवर एक जबरदस्त झलक दाखवली आहे.

करीना कपूरचा 'जाने जान' या चित्रपटाच्या काही सेकंदाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये करीना आत्तापर्यंतच्या सर्वात वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. या चित्रपटात तिच्यासोबतच जयदीप अहलावत आणि विजय वर्मा मनोरंजक भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून करिना ओटीटीमध्ये डेब्यू करणार आहे. निर्मात्यांनी 'जाने जान' चित्रपटाचा टिझर रिलीज करुन रिलीज डेट आणि नाव नेटफ्लिक्सच्या ऑफिसिल अकाउंटवर शेअर केलं आहे.

'जाने जान' हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी कादंबरीवर ही कथा आधारित आहे. या सिनेमाचा ट्रेलर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल, असा अंदाज वर्तवला जातं आहे. करीना कपूरचा हा चित्रपट तिच्या वाढदिवसालाच प्रदर्शित होणार आहे. करीना २१ सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा करत असते, त्याच दिवशी तिचा हा सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in