
चित्रपटांपेक्षा सध्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. तिच्यावर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप आहेत. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने तिला नियमित जामीन मंजूर केला असून कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. या प्रकरणात जॅकलिन अगोदरपासून अंतरिम जामिनावर बाहेर होती. (Jacqueline Fernandez gets bail)
उद्योगपती सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिन फर्नांडिसला लग्न करायचे होते. सुकेश जॅकलिनला अत्यंत महागडे गिफ्ट कायचम द्यायचा. इतकेच नव्हेतर फक्त जॅकलिनच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. नोरा फतेहीची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चाैकशी यापूर्वी झाली आहे. जॅकलिन फर्नांडिसवर होत असलेल्या सततच्या आरोपांवर सुकेशने जेलमधून एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात सुकेशने म्हटले होते की, माझ्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा काहीच संबंध नाही आहे. तिला या सर्व प्रकरणाविषयी काहीच माहिती नव्हते.