'जय भीम' फेम अभिनेता सूर्या करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; महाभारतातील 'या' योद्ध्याची साकारणार भूमिका

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात सूर्या दिसणार आहे.
'जय भीम' फेम अभिनेता सूर्या करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; महाभारतातील 'या' योद्ध्याची साकारणार भूमिका

सध्या सर्वत्र दाक्षिणात्य सिनेमांची हवा सुरु आहे. कथा आणि अॅक्शन यांच्यामुळे हे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत आहे. अशात बरेच दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास उत्सुक आहेत. अभिनेता अल्लू अर्जून लवकरच भूषण कुमार यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता तामिळ चित्रपट सृष्टीतील स्टार सूर्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सूर्या हा बॉलिवूडच्या सिनेमात झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात सूर्या दिसणार आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा महाभारतातील 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनवत असून तामिळ स्टार सूर्याने या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे. सूर्या हा तामिळ चित्रपट सृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेता आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांची त्यांच्या चित्रपटात 'कर्ण' या पात्रासाठी सूर्यासोबत चर्चा सूरू असल्याचे
म्हटले जात आहे. काहींच्या मते ही चर्चा जवळपास पूर्ण झाली असून लवकरच सुर्या या चित्रपटावर काम सुरु करणार आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा देखील केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाभारतातील 'कर्ण' या पात्रावर आधारित हा चित्रपट २ भागात येणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

या चित्रपटाचे शूटिंग २०२४ मध्ये होणार असल्याची शक्यता आहे. सध्या सूर्या हा त्याच्या 'कांगुवा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटाचे शूटिंग आधी पूर्ण करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा हे देखील या चित्रपटासाठी उत्सूक असून त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in