बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यांचा हा सिनेमा कधी प्रदर्शित होतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून या सिनेमाच्या माध्यमातून विकी आणि साराची नवी जोडी त्यांच्या चाहत्यांना स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.
विकी आणि सारा यांचा 'जरा हटके जरा बचके' हा पहिला एकत्रित चित्रपट असणार आहे. येत्या २ जून रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामुळे या सिनेमाची रिलीज डेट निश्चित करण्यात येत नव्हती. मात्र, 'जवान' सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याने हा सिनेमा २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली असून 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात शारिब हाश्मी, नीरज सूद आणि राकेश बेदी सारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी विकी आणि सारावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.