
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'जवान'ने पहिल्याच विकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'जवान'ने शनिवार-रविवार मिळून विकेंडला छप्परफाड कमाई केली आहे. 'जवान' या चित्रपटाची एका आठवड्याची कमाई बघून सर्वजण आवाक् झाले आहेत.
'जवान' या चित्रपटाने भारतात 75 कोटींमध्ये ओपनिंग केलं होत. ज्यात ज्याला 65.5 कोटी हिंदीतून आले होते आणि बाकीचे तामिळ आणि तेलुगू आवृत्त्यांमधून आले होते. या सिनेमाने शुक्रवारी 53.23 कोटीची कमाई केली आहे. तर शनिवारी 77.83 कोटींपर्यंत मजल मारली आहे. रविवारी या सिनेमाने सर्वांचे रेकॉर्ड तोडत 81 कोटींवर हात पोहचवला आहे. 'Sacnilk.com' नुसार 'जवान' चित्रपटाचे आतापर्यंतचं एकूण कलेक्शन सुमारे 287 कोटी झालं आहे.
या अहवालात पुढ म्हटलं आहे की, जवानच्या हिंदी शोसाठी एकूण 70.77 टक्के, तामिळ शोसाठी 53.71 टक्के आणि तेलुगू शोसाठी 68.79 टक्के असा त्याचा व्यवसाय होता. अशाप्रकारे फक्त ४ दिवसात जवानने २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याशिवाय जगभरात या सिनेमाने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचं बोललं जातंय.
शाहरुखच्या 'जवान' चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, विजय सेतुपती आणि नयनतारा , हे कलाकार आहेत. त्यामुळे आता शाहरुखचा 'जवान' सनी देओलच्या गदरचा रेकॉर्ड मोडू शकतो का? याकडे सगळयांच्या नजरा लागल्या आहेत.