Jawan : शाहरुखच्या चाहत्यांचा अतिउत्साह अंगलट ; सिनेमागृहात फटाके फोडणाऱ्या चाहत्यांवर गुन्हे दाखल

मालेगावमध्ये गेल्या १० वर्षात ३०हून अधिक वेळा काही उत्साही चाहत्यांनी चित्रपटगृहात फटाके फोडल्याचे प्रकार घडले आहेत.
Jawan : शाहरुखच्या चाहत्यांचा अतिउत्साह अंगलट ; सिनेमागृहात फटाके फोडणाऱ्या चाहत्यांवर गुन्हे दाखल

अभिनेता शाहरुखनाच्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अजूनही या चित्रराटाची क्रेज जराही कमी झालेली नाही. अशात मालेगावत शारहुखचा मोठा चाहता वर्ग आहे. काल संध्याकाळी मालेवातील थिएटरमध्ये जवानचा शो सुरु असताना शाहरुखच्या काही चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाक्यांची आतषबाजी केली. मात्र चाहत्यांना हा उत्साह चांगलाच महागात पडला आहे. पोलिसांनी या चाहत्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आधी पठाण आणि आणि आता जवान या चित्रपटांनी अजूनही शाहुखच बॉलीवूडचा किंग असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याच्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातल रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.अजुही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात नाशिकच्या मालेगावत शाहरुखचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, मालेगाव शहरातील कमलदीप चित्रपटगृहात शाररुख खानचा जवान हा सिनेमा सुरु असताना त्याच्या चाहत्यांनी थेठ सिनेमागृहातच फटाके फोडल्याची धक्कादायक घटना घडली. चित्रपटगृहात फटाके फोडल्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सिनेमा बघायला आलेल्या इतर चाहत्यांना मात्र धक्काच बसला आहे. या घटनेमुळे ऐन भरात असलेला सिनेमा बंद करावा लागला.

नाशिकच्या मालेगावत हिंदी चित्रपटांची चांगलीच चलती आहे. काही तरुण तर अभिनेत्यांच्या प्रेमात पछाडलेले आहेत. त्यांचा कुठलाही नवी चित्रपट आला की, त्याचे चाहते मोठी गर्दी करतात. चित्रपटात अभिनेत्यांची एन्टी होतात त्यांचं जोरदार स्वागत होतं. मालेगावमध्ये गेल्या १० वर्षात ३०हून अधिक वेळा काही उत्साही चाहत्यांनी चित्रपटगृहात फटाके फोडल्याचे प्रकार घडले आहेत. वेळोवेळी या चाहत्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. काल(६ऑक्टोबर) रोजी संध्याकाळच्या शो दरम्यान अशाच काही उत्साही चाहत्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवत या उत्साही चाहत्यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी त्यांच्याकडून पटाके, सुतळी बॉम्ब जमा करण्यात आले. या चाहत्यांवर रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in