Jawan : शाहरुख आणि नयनतारा बेभान! 'जवान' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

या गाण्यात शाहरुख आणि नयनतारा बेभान नाचताना दिसत आहेत.
Jawan : शाहरुख आणि नयनतारा बेभान!  'जवान' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'पठाण'(Pathan) या सिनेमाच्या यशानंतर अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) यांचा आगामी 'जवान'(Jawan) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा झाली सुरु आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. 'जवान' या सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनतारा(Nayantara) हे मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्या या सिनेमातील गाण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अशात त्याच्या सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

शाहरुख आणि नयनतारा यांच्या 'जवान' सिनेमातील 'नॉट रमैया वस्तावैया'(Not Ramaiya Vastavaiya) हे गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात शाहरुख आणि नयनतारा बेभान नाचताना दिसत आहेत. 'नॉट रमैया वस्तावैया' या गाण्यात शाहरुख विविध गेटपमध्ये दिसून येत आहे. या गाण्यातील शाहरुख आणि नयनतारा यांची केमिस्ट्री दिसून येत आहे.

शाहरुख च्या 'जवान' या सिनेमाचा ट्रेलर लवकरच येणार आहे. ,सोमवार(२८ ऑगस्ट) रोजी निर्माते 'जवान'चा ट्रेलर रिलीज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमात शाररुख आतापर्यंतच्या त्याच्या सर्वात अनोख्या अवतारात दिसणार आहे. अशात 'जवान'ने अमेरिकेत(America) पहिल्या दिवसासाठी आगाऊ $225K म्हणजेच 1.85 कोटी रुपयांची बुंकिंग केली आहे.

'जवान' हा बहुचर्चित आणि बहुप्रदर्शित सिनेमा ७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता शाहरुख खान सोबत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील या सिनेमात झळकणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in