जेनिफर मिस्त्रीने केला असित मोदींवर नवा आरोप; म्हणाली, "मालिकेच्या सेटवर..."

जेनिफर मिस्त्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातील एक नवा आणि धक्कादायक आरोप केला आहे.
जेनिफर मिस्त्रीने केला असित मोदींवर नवा आरोप; म्हणाली, "मालिकेच्या सेटवर..."

'तारक मेहता का उलटा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ही मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या मालिकेतील कलाकार आपल्या विनोदी अभिनयानं खिळवून ठेवतात. मात्र, गेल्या काही दिवसापासून या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत. मालिकेतील काही कलाकारांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

'तारक मेहता का उलटा चष्मा' या विनोदी मालिकेतील मिसेस सोढी अर्थात जेनिफर मिस्त्री हिने मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. आता जेनिफर मिस्त्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातील एक नवा आणि धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या मालिकेच्या सेटवर लहान मुलांना अर्थात टप्पू सेनेला त्रास देण्यात आला असल्याचा आरोप जेनिफर मिस्त्रीनं केला आहे.

मालिकेच्या सेटवर लहान मुलांना फार जास्त त्रास देण्यात आला असून त्यांच्या परिक्षेच्या वेळी देखील त्यांना सुट्टी दिली जात नसल्याचं जेनिफरनं सांगितलं आहे. मालिकेत काम करणारे लहान मुलं अर्थात टप्पू सेना रात्रभर शुटिंग करायचे आणि सकाळी परिक्षेला जात होते. बऱ्याच वेळा ते परिक्षेवरुन थेट मालिकेच्या सेटवर पोहचायचे. तसंच बऱ्याचदा ते सेटवरच अभ्यास करायचे. परिक्षेच्या वेळी देखील मुलांना सुट्टी दिली जायची नाही, असा गंभीर आरोप जेनिफरने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर केला आहे. जेनिफर मिस्त्रीने या आधी देखील असित मोदी यांच्या गंभीर आरोप केले आहेत. आता तिने केलेल्या या नवीन आरोपांमुळे सर्वांना धक्का बसला आहे.

logo
marathi.freepressjournal.in