Jitendra Awhad : ही कथा फक्त ३ महिलांची आहे. चित्रपट चालावा यासाठी ३२ हजार महिला...म्हणजे एकंदरीत काय ?

'द केरला स्टोरी' हा चित्रपट बनावटपणाच्या शिखरावर असल्याची टीका केली. केरळची खरी परिस्थिती वेगळी असल्याचे ते म्हणाले.
Jitendra Awhad : ही कथा फक्त ३ महिलांची आहे. चित्रपट चालावा यासाठी ३२ हजार महिला...म्हणजे एकंदरीत काय ?

'द केरला स्टोरी' हा चित्रपट दिवसेंदिवस अधिकच वादग्रस्त ठरत चालला आहे. या चित्रपटाला भाजपकडून पाठिंबा दिला जात आहे, तरी महाविकास आघाडीचे नेते हा चित्रपट केवळ राजकीय हेतूने प्रचाराचा चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसंच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे. त्यात त्यांनी 'द केरला स्टोरी' हा चित्रपट बनावटपणाच्या शिखरावर असल्याची टीका केली. केरळची खरी परिस्थिती वेगळी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मंगळवारी (9 मे) ट्विटरवर आपली भूमिका मांडली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे बनावटपणाची उंची आहे. केरळमध्ये खरी परिस्थिती वेगळी आहे. भारतात येणारा ३६ टक्के पैसा केरळचे नागरिक परदेशातून पाठवतात. गेल्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळमध्ये बालमृत्यूचे प्रमाण ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के आणि उत्तर प्रदेशात ४६ टक्के आहेत. केरळचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत ७ टक्के अधिक आहे,’ अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “चित्रपटाचे निर्माते स्वत: सांगतात की त्या चित्रपटात ३२ हजार महिलांची कथा सांगितली आहे, पण ही कथा फक्त ३ महिलांची आहे. म्हणजे 32 फक्त चित्रपट चालावा यासाठी महिला बहिणींची बदनामी करायची असेल तर? आमच्या महिला बहिणी मूर्ख आहेत का ?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in