Kalki 2898 AD: जगातील सर्वात मोठ्या IMAX थिएटरमध्ये प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी'चा झाला प्रीमियर!

Hindi Movie: 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट जगभरात एक ब्लॉकबस्टर ठरला आहे. ज्याने केवळ १५ दिवसात जागतिक बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
Kalki 2898 AD: जगातील सर्वात मोठ्या IMAX थिएटरमध्ये प्रभासच्या 'कल्की  २८९८ एडी'चा झाला प्रीमियर!
Published on

Iconic TCL Chinese Theatre: २७ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'कल्की २८९८ एडी' प्रदर्शित होण्याआधी पासूनच फारच चर्चेत होता. वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून 'कल्की २८९८ एडी' बघितले जात आहे. हा चित्रपट जगभरात एक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा एक अशा चित्रपटांपैकी एक आहे ज्याने केवळ १५ दिवसात जागतिक बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या चित्रपटाने आता आपल्या देशाची सीमाही ओलांडली आहे. अलीकडेच प्रतिष्ठित TCL चायनीज थिएटरमध्ये 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. १९२७ पासून, TCL चायनीज थिएटर सर्वात प्रमुख रेड-कार्पेट मूव्ही प्रीमियर आणि विशेष कार्यक्रमांचे घर आहे. या ठिकाणी हॉलिवूडचे सर्वात मोठे आणि स्टार त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी येतात.

Kalki 2898 AD: जगातील सर्वात मोठ्या IMAX थिएटरमध्ये प्रभासच्या 'कल्की  २८९८ एडी'चा झाला प्रीमियर!
Manorathangal: ९ कथा, ९ सुपरस्टार आणि ८ दिग्दर्शक... ‘मनोरथंगल’चा ट्रेलर प्रदर्शित

मिळाला तुफान प्रतिसाद

या स्क्रिनिंगला ९०० हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते, ज्यांनी चित्रपटाला प्रोत्साहन दिले. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही लक्षणीय प्रभाव पाडला आहे. कार्यक्रमाला उपस्थित वैविध्यपूर्ण प्रेक्षकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. उदंड प्रतिसाद पाहून दिग्दर्शक नाग अश्विन यांनी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांशी संवाद साधला.

Kalki 2898 AD: जगातील सर्वात मोठ्या IMAX थिएटरमध्ये प्रभासच्या 'कल्की  २८९८ एडी'चा झाला प्रीमियर!
अमेय वाघ आणि अमृता खनविलकर विचारतायेत "आपण शोधायचं का रोहित चौहानला?"
Kalki 2898 AD: जगातील सर्वात मोठ्या IMAX थिएटरमध्ये प्रभासच्या 'कल्की  २८९८ एडी'चा झाला प्रीमियर!
Google Aai: शोध..भीती..काळजी..अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा ट्रेलर प्रदर्शित!

नाग अश्विन दिग्दर्शित, 'कल्की २८९८ एडी' ने आपल्या कथाकथनाने आणि उत्कृष्ट कामगिरीने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी, शोभना, राजेंद्र प्रसाद आणि ब्रह्मानंदम, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर यांच्यासह बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोण यांचा समावेश असलेला हा चित्रपट ६०० कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये तयार करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in