कन्नड अभिनेत्याला न्यायालयाचा झटका; फसवणूक प्रकरणात कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रींकडे ३ कोटी रुपये रक्कम जमा करा, नंतरच तुमच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेऊ
कन्नड अभिनेत्याला न्यायालयाचा झटका; फसवणूक प्रकरणात कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
Published on

मुंबई : चित्रपट निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा उर्फ ध्रुव कुमार याला तातडीचा दिलासा देण्यास सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रींकडे ३ कोटी रुपये रक्कम जमा करा, नंतरच तुमच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेऊ, असे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने अभिनेता सर्जाला सुनावले आणि कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

ध्रुव सर्जाच्या याचिकेवर सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी सर्जाच्या वतीने ज्येष्ठ वकील एम. एस. श्यामसुंदर सेनी यांनी युक्तिवाद केला. २०१९ मध्ये एका चित्रपटासाठी करार केल्यानंतर चित्रपट निर्माता राघवेंद्र हेगडे यांच्याकडून ३ कोटी रुपये मिळाले, या वस्तुस्थितीबाबत सर्जाचे कोणतेही दुमत नाही. पैसे मिळाल्याबद्दल आम्ही काहीही नाकारत नाही. सर्जा एक कलाकार असल्याने त्याने चित्रपटासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली होती, असा दावा ॲड. सेनी यांनी केला.

योगींवरील चित्रपट प्रदर्शनाला परवानगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ चित्रपट कोणत्याही एडिटींगशिवाय प्रदर्शित करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. चित्रपटाला कुठेही कात्री लावली जाणार नसल्याने चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट न्यायमूर्ती डेरे आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठाने पाहिला. त्यानंतर खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ चित्रपटावर आक्षेप घेतला होता.

logo
marathi.freepressjournal.in