पठाण प्रदर्शित झाल्यास... करणी सेनेच्या सदस्याने दिली चित्रपटगृह जाळण्याची धमकी

पठाण पहिल्या दिवशी 40 कोटी कमवू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक
पठाण प्रदर्शित झाल्यास... करणी सेनेच्या सदस्याने दिली चित्रपटगृह जाळण्याची धमकी

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. विविध कारणांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी त्याचे आगाऊ बुकिंग सर्वत्र सुरू असल्याने शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी यावर टीका केली तर काहींनी या चित्रपटाचे समर्थन केले. पठाण पहिल्या दिवशी 40 कोटी कमवू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक असतानाच काही लोकांनी या चित्रपटाविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे.

अहमदाबादच्या सायबर क्राईम पोलिसांनी सिनेमा हॉल जाळण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यास सिनेमा हॉल जाळून टाकण्याची धमकी एका ३३ वर्षीय व्यक्तीने दिली होती. नुकतेच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या माहितीनुसार, सनी शाह असे या तरुणाचे नाव असून, तो आधी करणी सेनेचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in