Freddy Movie : कार्तिक आर्यनने सादर केला त्याच्या आगामी चित्रपट 'फ्रेडी'चा नवीन पोस्टर

कार्तिक आर्यन अभिनित 'फ्रेडी' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून दर्शकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे.
Freddy Movie : कार्तिक आर्यनने सादर केला त्याच्या आगामी चित्रपट 'फ्रेडी'चा नवीन पोस्टर

कार्तिक आर्यन अभिनित 'फ्रेडी' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून दर्शकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, आयएमडीबी (IMDb) वर भारतातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपट आणि शोच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या या जबरदस्त टीझरमध्ये कार्तिकला फ्रेडीच्या भूमिकेत दाखवण्यात आले असून चित्रपटातील 'काला जादू' हे गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे. यानंतर, निर्मात्यांनी आता चित्रपटातील फ्रेडीच्या 'जुनून' ची भूमिका करणाऱ्या कैनाझच्या भूमिकेतील अलाया एफचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

फ्रेडी आणि कैनाझच्या या स्पाइन चिलिंग रोमँटिक पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढत असतानाच, दर्शक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये, कार्तिक आर्यनला अलाया एफच्या मागे पहिले जाऊ शकते, अलायाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते आहे.

प्रेम, लग्न, फसवणूक यासाठी फ्रेडी किती पुढे जाईल आणि कैनाझची कथा कुठे नेईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कार्तिक आर्यन आणि अलाया एफ अभिनित 'फ्रेडी'हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ रोजी केवळ डिझनी+हॉटस्टार (Disney+Hotstar) वर प्रदर्शित होईल.

कार्तिक आर्यन आणि अलाया एफ यांना अनोख्या अवतारात पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. एकीकडे, कार्तिक आर्यनने त्याच्या पहिल्या मोठ्या ब्लॉकबस्टरसह प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तर दुसरीकडे, अलाया एफने सैफ अली अभिनित 'जवानी जानेमन'या तिच्या पहिल्या चित्रपटात एक तरुण अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. दरम्यान, कार्तिक आर्यन पुढे 'शहजादा', 'आशिकी 3' आणि कबीर खानच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. तर, अनुराग कश्यपसह अलाया एफचा आगामी चित्रपट 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'चा वर्ल्ड प्रीमियर लवकरच मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे आणि फ्रेडीसह यू-टर्नमध्ये देखील दिसेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in