'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर केदार शिंदेंच्या पत्नीने दिली 'अशी' प्रतिक्रिया, केदार शिंदे म्हणाले...

ज्या वेळी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला निर्माते मिळत नव्हते, तेव्हा...
 'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर केदार शिंदेंच्या पत्नीने दिली 'अशी' प्रतिक्रिया, केदार शिंदे म्हणाले...

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला असून या चित्रपट प्रदर्शीत होऊन आता आठवडा उलटला आहे. सुरुवातीपासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगीर करताना पाहायला मिळत आहे. 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट पाहिल्यानंतर केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिली होती.

हा चित्रपट सहा बहिणींच्या कथेवर आधारित असून या चित्रपटात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी सुचित्रा बांदेकर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने महिलांच्या मनावर गारुड केलं असून चित्रपटाची कथा, अभिनय याबरोबरचं या सिनेमातील गाण्यांनी प्रेषकांच्या मनात घर केलं आहे.

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट हिट झाल्यानंतर दिग्दर्शित केदार शिंदे यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना 'बाईपण भारी देवा' या सिनेमाविषयी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची प्रतिक्रिया काय होती? असा विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, "माझी पत्नी बेला शिंदें ही चित्रपटाची सहनिर्माती होती. ज्या वेळी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला निर्माते मिळत नव्हते, तेव्हा तिने मला सांभाळून घेतलं. ती या चित्रपटात एक महत्त्वाचा भाग म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. काही दिवसांपूर्वी शांतपणे ती मला म्हणाली, 'सर्व ठिक आहे. मला इतकंच कळलं की बायकांचं मन कळतं, बायकोचं मन कळत नाही.' ही माझ्यासाठी अक्षरशः खूप मोठी प्रतिक्रिया होती", असं केदार शिंदे म्हणाले.

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस या सिनेमाने १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यातपर्यंत या सिनेमाने ५७.१५ कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाने प्रदर्शीत झाल्यापासून २४ दिवसात ६५.६१ कोटींचा चांगलाच गल्ला जमवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in