'द केरळ स्टोरी' मागे टाकणार का 'द काश्मीर फाइल्स'ला ?

बॉक्सऑफिसवर 'द केरळ स्टोरी'चा धुमाकूळ
'द केरळ स्टोरी' मागे टाकणार का  'द काश्मीर फाइल्स'ला ?

प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा प्रदर्शनानंतर मात्र बॉक्सऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. सतत चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाने भारतभरात धुमाकूळ घातला आहे.

५ मे रोजी 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट भारतभरात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने फार काही खास कमाई केली नव्हती . वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली. मध्यप्रदेशमध्ये या चित्रपटाला टॅक्स फ्री घोषित करण्यात आले. 'द केरळ स्टोरी' ने आतापर्यंत ३३.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

देशभरात हा चित्रपट जवळपास १३०० स्क्रीन्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे स्क्रीन्स आणखी वाढतील अशीही चर्चा आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाचं कलेक्शन वाढत आहे. असं झालं तर कदाचित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' ला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे सुदिप्तो सेन यांनी तर अभिनेत्री अदा शर्माच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in