‘खालिद का शिवाजी’ कान्स चित्रपट महोत्सवाच्या यादीतून बाहेर? चित्रपटातील ‘आक्षेपार्ह’ मजकुरावरून आशिष शेलार यांचे संकेत

‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट खोटी माहिती पसरवत असल्याच्या आणि जनभावना दुखावत असल्याच्या तक्रारी मिळताच महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई केली असून, त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्परीक्षा करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी दिली.
‘खालिद का शिवाजी’ कान्स चित्रपट महोत्सवाच्या यादीतून बाहेर? चित्रपटातील ‘आक्षेपार्ह’ मजकुरावरून आशिष शेलार यांचे संकेत
Published on

मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट खोटी माहिती पसरवत असल्याच्या आणि जनभावना दुखावत असल्याच्या तक्रारी मिळताच महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई केली असून, त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्परीक्षा करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी दिली.

या चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा विकृत केल्याचा आरोप करत काही उजव्या विचारसरणीच्या गटांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवाच्या यादीतूनही हटवण्यात येणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना पत्र पाठवून ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाला दिलेल्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्परीक्षा करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. तसेच चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली.

पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे सध्याच्या स्वरूपात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

शेलार म्हणाले, ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट खोटी माहिती पसरवतो आणि जनभावना दुखावतो, अशा तक्रारी मिळताच सरकारने त्वरित पावले उचलली. शिवभक्त आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.

मे महिन्यात कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले होते. त्यावर शेलार म्हणाले, चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची शिफारस करणाऱ्यांवर जबाबदारी आहे. निर्माते व दिग्दर्शकांना सेन्सॉर मंडळाने चौकशीसाठी बोलावले आहे.

logo
marathi.freepressjournal.in