खिलाडी कुमारचा चाहत्यांना सुखद धक्का ; 'मिशन राणीगंज'चा अंगगावर काटा आणणारा टीझर रिलीज

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
खिलाडी कुमारचा चाहत्यांना सुखद धक्का ; 'मिशन राणीगंज'चा अंगगावर काटा आणणारा टीझर रिलीज

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी नेहमीचं चर्चेत असतो. गेल्या महिन्यात त्याचा ओएमजी २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकत चांगली कमाई देखील केली आहे. या सिनेमातून अक्षयने किशोरवयीन मुलांच्या लैंगिकतेवर भाष्य केलं आहे. ओएमजीच्या यशानंतर अक्षने त्याच्या चाहत्यांना आता एक नवी गोड बातमी दिली आहे.

ओएमजी २ने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातल दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पौगडावस्थेत मुलांचे लैगिक शिक्षण अशा वेगळ्या विषयांवर आधारित त्या चित्रपटाने जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमामुळे अक्षयचं सर्वत्र कौतूक केलं जात आहे. आता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर टीझर समोर आला आहे.

अक्षय या टीझरमध्ये पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'मिशन 'रानीगंज' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं नाव यापूर्वी दोन वेळा बदललं गेलं असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.

ओएमजी २ चित्रपटाला प्रदर्शित होऊन महिना उलटला नाही तोवर त्याने आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा करुन त्याच्या चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे. प्रदर्शित होताच या टीझरला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. दगडी कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी एक इंजिनिअर स्वताच्या जीवाची बाजी लावतो. त्याची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे.

सुरुवातीला या सिनेमाचं नाव 'कॅप्सूल गिल' असं ठेवण्यात आलं होतं. यानंतर हे नाव बदलून 'द ग्रे इंडियन एस्केप' असं करण्यात आलं होतं. या नावाची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मात्र, 'मिशन राणीगंज' असं करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in